नटसम्राट हे नाटक एका कलाकाराची व्यथा सांगणारा नाटक आहे. या नाटका मध्ये श्रीराम लागू(कुसुमाग्रज) यांची व्यथा मांडलेली आहे. नटसम्राट हि वी.वा. शिरवाड करांची कादंबरी आहे. या नाटकातील नटसम्राटाची भूमिका अनेक वर्ष श्रीराम लागू यांनी केली आहे. या नटसम्राट नाटकात श्रीराम लागू नंतर अनेक जणांनी नटसम्राटाची भूमिका केली.त्यामध्ये सतीश दुभाती,वूपेन्द्र दाते,यशवंत दत्त,चंद्रकांत घोखले,दत्ता भट,मधुसुधन कोलटकर,राजा गोसावी,गिरीश देशपांडे आणि त्याच बरोबर बॉलीवूड चे मराठी कलाकार नाना पाटेकर यांनी देखील नटसम्राटाची भूमिका केली आहे. या नाटकाला रंगभूमीवर येवून अनेक वर्ष झाली. तरीही आजपण हे नाटक बघताना डोळ्यात पाणी येते. हे नाटक करणे साधी सुधी गोष्ट नाही आहे. या नाटकामध्ये नटसम्राटाची भूमिका करण्यासाठी मानसिक दृष्ट्या चांगला असावा लागतो. कारण या नाटकातील नटसम्राटाची भूमिका बजावताना अनेक कलाकारांना थकवा जाणवतो.
या नाटकाचा दि गोवा हिंदू असोशियेषण कला विभाग या संस्थेने २३डीसेम्बर , इ.स. १९७० ला बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई इथे सादर करण्यात आला. या नाटकामध्ये एका वृद्ध व्यक्तीची कथा मांडलेली आहे. एखादा माणूस म्हातारा झाल्यावर त्याला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे या नाटकात मांडलेले आहे. या नाटकातील नटसम्राट आपल्या जीवनात कमावलेली सगळी संपती मुलांच्या नावावर करून कसा फसतो हे या नाटकाच्या माध्यमातून मांडलेली आहे. पैसा असताना आपल्या जवळ सगळी जन असतात पण पैसा एकदा आपण आपल्या मुलांच्या स्वाधीन केल्या नंतर आपल्याला कशा प्रकारे लांब करतात हे या नाटकातून सांगितलेले आहे. त्यानंतर आपली संपत्ती मुलांच्या नावे करून तीच मुल आपल्याला आपल्याच घराच्या बाहेर काडतात. त्याचबरोबर पोरगी कशाप्रकारे चोरीचा आरोप घेवून स्वत पासून दूर करते. हे या नाटकाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. जेव्हा आपल्याच माणसांपासून दूर होवून पुढची जिंदगी कशा प्रकारे जगली जाते हे या नाटकातून सांगण्यात आलेली आहे
No comments:
Post a Comment