फेसबुक हि सोशिअल साईट आहे. आणि संवाद साधण्याचं मोठं माध्यम आहे. या माध्यमातून आपण अनेक नवीन मित्र बनवू शकतो आणि त्यांच्याशी आपण बोलू पण शकतो. या मध्ये आपण अनेक प्रकारची माहिती इतरांना पाठवू शकतो . त्यामधून आपण अनेक माहिती मिळवू शकतो. पण जेवढे या फेसबुक चे चांगले फायदे आहेत तेवढे त्याचे वाईट कारण पण आहेत. एकतर आपण हे माध्यम वापरल्या मुले आपला वेळ व पैसा या दोन्ही गोष्टी वाया जातात.
त्या नंतर आपण ज्या मित्राजवळ बोलत असतो तो मित्र तोच सुद्धा असू शकत नाही. कारण फेसबुक वर खूप जनांचे वेगळ्या नावाने किंवा मुलीच्या नावाने अकाउंट उघडलेले असतात . त्याला इंग्लिश मध्ये फेक अकाउंट असे म्हणतात. या फेक अकाउंट च्या माध्यमातून कोणत्याही मुलाची अथवा मुलीची फसवणूक होवू शकते. यात जास्तीत जास्त मुलांचे फेक अकाउंट असतात. आणि या मध्ये मुली खूप प्रमाणात फासळ्या जातात. मग यातून खूप प्रमाणात मुलीचे आत्महत्येचे प्रकार घडतात. त्यानंतर आपण जे फोटो अपलोड करतो त्या फोटोंचा दुरउपयोग केला जातो. आणि या फेसबुक च्या माध्यमातून आपण एखादी माहिती चुकीची किंवा अपमानास्पद टाकली. तर आपल्याला अटक होऊ शकते. म्हणून फेसबुक या सोशल साईट चा कामापुरतीच उपयोग करावा.
No comments:
Post a Comment